14 December 2017

News Flash

धर्मेंद्र-बॉबी देओलने जागवल्या ‘शोले’च्या आठवणी

नव्या भागात आम्ही लोकांना रडविणार आहोत

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 13, 2017 6:53 PM

बॉबी देओल आणि धर्मेंद्र

धमेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांचा ‘यमला पगला दिवाना’ हा विनोदीपट आला होता. या सिनेमातून पहिल्यांदा बाप- लेकांची ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र आली होती. सध्या या सिनेमाच्या सिक्वलचे म्हणजे ‘यमला पगला दिवाना फिर से’च्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात झालीये. पहिल्या दिवसाच्या चित्रीकरणाचा एक फोटो बॉबी देओलने सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये धर्मेंद्र यांच्यासह बॉबी देओल दिसत असून, दोघांनी ‘शोले’ स्टाइल पोज दिली आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सनी देओलची कमतरता जाणवत आहे. या फोटोला कॅप्शन देताना बॉबीने लिहिले की, ‘यात यमला आणि दिवाना आहे, पण पगल्याची कमतरता आहे. त्याच्या येण्याची वाट बघतोय.’

खरं तर ‘यमला पगला’ सीरिजचे पहिले दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटले होते. या सिनेमाचा इतिहास माहित असतानाही आता तिसऱ्या सिनेमाच्या निर्मितीचा विचार का केला असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे. याविषयी जेव्हा अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी चर्चा केली तेव्हा ते म्हणाले की, ‘दोन्ही सिनेमांमध्ये आम्ही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले, त्यांना खूप हसविले. आता या नव्या भागात आम्ही लोकांना रडविणार आहोत.’

या सिनेमात धर्मेंद्र यांच्यासह सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन पंजाबी सिनेनिर्माते नवनीत सिंग करणार असून हा सिनेमा विनोदीपटासह भावनिकही असणार आहे.

या तिघांव्यतिरिक्त सनी देओलचा मुलगा करण देओलही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘पल पल दिल के पास’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये तो सध्या व्यग्र आहे. स्वतः सनी या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.

नुकतेच या सिनेमाचे मनाली येथील चित्रीकरण पूर्ण झाले असून तेथील चित्रीकरणाचे काही फोटो सनीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. अॅक्शनपट असणाऱ्या या सिनेमात रोमान्सही असणार असे सनीने एका मुलाखतीत सांगितले. करणने ‘यमला पगला दिवाना २’ या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

First Published on August 13, 2017 6:50 pm

Web Title: yamla pagla deewana phir se shoot begins bobby deol and dharmendra become jay and viru see photo