यशराज फिल्म्सचा आगामी चित्रपट ‘गुंडे’ हा हिंदी तसेच बंगाली भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे.
रणवीर सिंग, अर्जुन कपूर, इरफान खान आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गुंडे’ १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा बहुतांश भाग हा कोलकत्यात चित्रीत करण्यात आला आहे. कोलकत्यातील १९७० सालच्या सर्वात अनावर काळावर चित्रपटाची कथा आधारित आहे. चित्रपट बंगाली मध्ये देखील प्रदर्शित करण्याची योजना पूर्व निर्मिती टप्प्यापर्यंत निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी नुकताच ‘गुंडे’चा हिंदी टीझर लाँच करण्यात आला होता. या आठवड्यात त्याचा बंगाली ट्रेलर लाँच करण्याचा विचार निर्माते करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 7:11 am