18 January 2021

News Flash

‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील अभिनेत्रीने केले कोर्टात लग्न

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती...

सध्या अनेक सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत. अभिनेत्री सना खान, नेहा कक्कर, आदित्य नारायण पाठोपाठ आता ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अभिनेत्री शिरिन सेवानीने बॉयफ्रेंड उदयन सचनशी लग्न केले आहे.

शिरिन आणि उदयनने करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रविवारी दिल्लीमध्ये कोर्टात लग्न केले आहे. काही मोजक्याच लोकांना त्यांनी आमंत्रण दिले होते. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली आहे. शिरिनने ‘ये र‍िश्‍ता क्‍या कहलाता है’ या मालिकेमध्ये जसमीत माहेश्वरीची भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirin sewani (@shirin_sewani)

आणखी वाचा- राहुल बिग बॉसच्या घरातून का बाहेर पडला?- गौहर खान

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिरिनने तिची आणि उदयनची भेट कशी झाली हे सांगितले आहे. ‘आमची पहिली भेटे आमच्या एका मित्राच्या बर्थडे पार्टीमध्ये झाली होती. जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हाच एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो आणि आज आम्ही एकत्र आहोत’ असे शिरिन म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 2:45 pm

Web Title: yeh rishta kya kehlata hai fame shirin sewani wedding avb 95
Next Stories
1 राहुल बिग बॉसच्या घरातून का बाहेर पडला?- गौहर खान
2 शूटिंगदरम्यान वरुण धवनला करोनाची लागण
3 अभिनेता मनीष पॉलला करोनाची लागण
Just Now!
X