News Flash

‘येऊ कशी तशी मी नांदायला’मधील ‘त्या’ दृश्यावर सोशल मीडियावर होतेय टीका

मालिका वादाच्या भोवऱ्या अडकली आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका जानेवारी महिन्यात सुरु झाली आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमकार प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण आता सोशल मीडियावर या मालिकेतील एका दृश्यावर टीका केली जात आहे.

‘येऊ कशी तशी मी नंदायला’ या मालिकेत ओमकार खानविलकार हा प्रचंड श्रीमंत दाखवला आहे. त्याची मोठी बहिण मालविका हिला गर्भश्रीमंत असल्याचा प्रचंड गर्व आहे. ती मालिकेत गरीबांशी चुकीच्या पद्धतीने वागते तसेच तिला त्यांची चीड देखील येत असल्याचे पाहायला मिळते. नुकताच पार पडलेल्या एका भागामध्ये मालविका त्यांच्या घरातील सदस्य रॉकीला अत्यंत वाईट शिक्षा देते. ती रॉकीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालते आणि त्याला कुत्र्याप्रमाणे गार्डनमध्ये वागण्याची शिक्षा देते. ते पाहून प्रेक्षकांनी या दृश्यावर आक्षेप घेतला आहे.

या मालिकेची कथा स्वीटू, ओमकार, निलू, शकू , रॉकी या पात्रांभोवती फिरत आहे. तसेच एका गरीब घरातील मुलगी श्रीमंत घरातील सून होणार असल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर हे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 12:58 pm

Web Title: yeu kashi kashi me nandayla serial scene created anger on social media avb 95
Next Stories
1 हे कलाकार होणार आईबाबा, या वर्षात देणार आहेत गुडन्यूज
2 सुनील शेट्टीने ‘बालाजी मीडिया फिल्म्स’ विरोधात केली तक्रार
3 गौहर खानच्या वडिलांचे निधन
Just Now!
X