दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेली ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. पण, ज्याप्रकारे गुलाबासोबत काटे येतात त्याचप्रमाणे कलाकारांना चाहत्यांसोबत निंदकांचाही सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय काही दिवसांपूर्वी तमन्नाला आला.

वाचा : ‘बीच वेडिंग’साठी रणवीर- दीपिका सज्ज?

लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीला एका अनपेक्षित अनुभवाला तोंड द्यावे लागले. तमन्ना काही दिवसांपूर्वीच हैदराबाद येथील हिमायत नगर भागात एका ज्वेलरी शॉपच्या उदघाटनासाठी गेली होती. त्यावेळी एका ३१ वर्षीय युवकाने तमन्नावर बूट फेकला होता. याविषयी तमन्नाला विचारले असता ती म्हणाली की, एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी असे वागल्यावर त्या क्षणाला तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यावेळी तेथे बरेच सुरक्षारक्षकही होते. जेव्हा चाहते फुलांचा गुच्छ देऊन आमचे स्वागत करतात तेव्हा कलाकार म्हणून आम्ही गप्प असतो. तर काही वेळा लोक आमच्यावर बूटही फेकतात.

वाचा : ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणून विकण्यासाठी त्यांनी मॉडेलला सुटकेसमध्ये भरलं अन्…

करीमुल्लाह असे नाव असणाऱ्या व्यक्तीने तमन्नावर बूट फेकला होता. मात्र, त्याने फेकलेला बूट तमन्नाला लागला नाही. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने करीमुल्लाहला ताब्यात घेतले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, तमन्नावर बूट फेकण्याचा त्या चाहत्याचा उद्देश नव्हता. पण, बाउन्सर्स चाहत्यांना तिला भेटू देत नव्हते त्यामुळे तो उदास झाला होता.