News Flash

‘अभिनयच चांगला नाही केला तर पीआर तरी काय करणार?’

..तरच तुम्हाला चांगले काम मिळू शकते

प्रियांका चोप्रा

क्वांटिको या मालिकेद्वारे प्रियांकाने आंतरराष्ट्रीय पातळीवर तिचा ठसा उमटवत देशविदेशातील प्रेक्षकांनाही भुरळ घातली आहे. अशी ही देसी गर्ल लवकरच बेवॉच या चित्रपटाद्वारे खऱ्या अर्थाने हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे असे म्हणावे लागेल. चित्रपट, करिअर आणि त्यामध्ये येणारी आव्हानं याबद्दल प्रियांकाने ‘एचटी’सोबत संवाद साधला.

‘प्रत्येक नवा अनुभव हा काहीतरी शिकवत असतो. इथे फक्त तुम्हाला गरज आहे ती म्हणजे मेहनतीची. तुम्ही फक्त मेहनत करत राहा. तुमची मेहनत कोणीही नाकारु शकत नाही’, असे म्हणत ‘अच्छा काम करो, अच्छा काम मिलेगा’, हा कामाचा मंत्रही प्रियांकाने सांगितला. यशासाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो असेही प्रियांकाने स्पष्ट केले.
‘प्रेक्षकांनी फक्त आणि फक्त तुमचाच अभिनय पाहिला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला चांगले काम मिळू शकते. त्यासाठी इतर कोणत्याही मार्गाची गरज नाही. प्रवक्ते (पीआर) किंवा इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब करुन हे साधता येत नाही. तुम्ही जोपर्यंत तुमच्या भूमिकेवर काम करत नाही, ती व्यक्तिरेखा खुलवत नाही तोपर्यंत प्रेक्षकही तुम्हाला प्रतिसाद देणार नाहीत, असे प्रियांकाने यावेळी स्पष्ट केले. प्रियांकाने यावेळी प्रेक्षकांची बाजू मांडत आजचा प्रेक्षकवर्ग सजग आहे असे म्हणत अनेकांचे लक्ष वेधले.

विविध प्रश्नांची उत्तरं देत असतानाच प्रियांकाला तिच्या आगामी चित्रपटाविषयीचा एक प्रश्न विचारण्यात आला की, ‘तुझ्या आगामी बेवॉच या चित्रपटासाठी तू उत्सुक आहेस का?’. बेवॉच या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रा एका नकारात्मक भूमिकेमध्ये दिसणार आहे. याच पार्श्वभूमीवर यावर उत्तर देताना प्रियांका म्हणाली, ‘भारतीय प्रेक्षकांनी नेहमीच माझ्या नकारात्मक भूमिकांना चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशातील प्रेक्षकवर्ग माझ्या नकारात्मक भूमिकेला कसा प्रतिसाद देणार हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे’.

प्रियांका चोप्रा हे नाव आता मनोरंजन विश्वात सर्वज्ञात झाले आहे. विविध चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारी ही देसी गर्ल सध्या निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. त्यामुळे सध्या ती शक्य त्या सर्व मार्गांनी मनोरंजन विश्वाला तिचे योगदान देत आहे असेच म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 11:08 am

Web Title: you have to work hard there is no other formula and strategy for success says priyanka chopra
Next Stories
1 पाँडिचेरीत स्वत:ला शोधताना..
2 शांभवी उलगडणार निर्मलाच्या आत्म्याचे रहस्य !
3 हिमालयाच्या कुशीत रंगली चिराग व काजलची ‘लव बेटिंग’
Just Now!
X