News Flash

सनी लिओनीची ‘फॅनगिरी’ पाहून तुम्हीही चकीत व्हाल!

सनी लिओनीसुध्दा लहानपणापासून कुणाचीतरी फॅन आहे

तुम्ही एखाद्या व्यक्तीचे फॅन असाल आणि ती व्यक्ती तुम्हाला अचानक भेटली तर तुमचा आनंद गगनात मावत नाही. आपण लगेचच त्या व्यक्तीसोबत सेल्फी घेऊन, ‘मला खरंच वाटत नाहिए’, ‘खूप आनंद होतोय’, अशा वाक्यांसह लगेच सोशल मिडियावर तो फोटो अपलोड करून आपली फॅनगिरी जगाला दाखवून देतो. पण तुम्हाला माहितेय का तुम्ही ज्या पॉर्नपरीचे म्हणजेच सनी लिओनीचे फॅन आहात तीसुध्दा लहानपणापासून कुणाचीतरी फॅन आहे ते? हो आणि ती व्यक्ती आहे, दस्तुरखुद्द खली.
‘डब्ल्यूडब्ल्यूई’ वर्ल्ड हेव्हिवेट चऍम्पियनशिपचा स्टार खली हा सनी लिओनीला एका विनानप्रवासात भेटल्यावर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि तिने ताबडतोब त्याच्यासोबत आपला फोटो काढून घेतला. एवढंच नव्हे तर तिने खली सोबतचा तो फोटो आपल्या ट्विटर हँडलवरही अपलोड केला आहे. त्यावर तिने म्हटले आहे की, ओह येहहह!!! डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्प ग्रेटखली.  माझे बालपणीचे स्वप्न… आता मी घरी जाऊन खलीच्या पकडीची तालिम करणार आहे.

त्यानंतर तिने शेअर केलेल्या विनोदी व्हिडिओमध्ये, खली बाऊट जिंकल्यावर कसा आनंद साजरा करतो याचासुध्दा अभिनय केला आहे. या ट्विटमध्ये तिने म्हटले आहे की, ‘मला माहित्येय मी विचित्र आहे, पण मला खलीची जबरदस्त पकड दाखवायलाच हवी.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 2:21 pm

Web Title: your favorite star sunny leone also had a fangirl moment
Next Stories
1 तन्मय भट्टच्या ट्विटला प्रियांकाचे सणसणीत उत्तर..
2 ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार ‘रुस्तम’चा थरार
3 सुनील बर्वे यांच्या ‘हर्बेरियम’चे नवे पान ‘अमर फोटो स्टुडिओ’!
Just Now!
X