नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने केली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत नवीन वर्षाचं स्वागत कसं करणार याबद्दल सांगितलं. त्यातच बॉलिवूड अभिनेत्री सैयामी खेर हिने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि या व्हिडीओने क्रिकेटर युवराज सिंगचं लक्ष वेधून घेतलं. सैयामीने फलंदाजी करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “२०२० मध्ये फ्रंट फूटवर खेळणार.”
सैयामीची फलंदाजी युवराजला आवडली आणि त्याने त्यावर कमेंट करत सैयामीची स्तुती केली. सैयामीची फ्रंट फूटवरील बॅटिंग पाहून युवराजने कमेंटमध्ये लिहिलं, “शॉट Buddy”. यावर सैयामीने उत्तर दिलं, “पण आताही तुझ्यासाठी गोलंदाजी करण्याची वाट पाहतेय.” आता यावर युवराज काय म्हणणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
2020 on the front foot pic.twitter.com/lcTn00p0dq
— Saiyami Kher (@SaiyamiKher) January 2, 2020
सैयामीला अभिनयाव्यतिरिक्त क्रिकेटची फार आवड आहे. कॉलेजला असताना ती युनिव्हर्सिटी क्रिकेट टीममधून खेळत होती. मात्र नंतर मॉडेलिंगसाठी अधिक वेळ द्यावा लागल्याने तिला क्रिकेट सोडावं लागलं. आताही फावल्या वेळेत ती क्रिकेट आवर्जून खेळते. क्रिकेटसोबतच तिला बॅडमिंटनचीही फार आवड आहे. बॅडमिंटनमध्ये तिने ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत सायना नेहवालला टक्कर दिली होती. तेव्हापासून ती आणि सायना एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.
Shot buddy !
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— yuvraj singh (@YUVSTRONG12) January 2, 2020
but still waiting to bowl to you!
— Saiyami Kher (@SaiyamiKher) January 2, 2020
सैयामीने आतापर्यंत ‘रे’ आणि ‘मिर्जियाँ’ या दोन हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २०१८ मध्ये तिने रितेश देशमुखच्या ‘माऊली’ चित्रपटातही भूमिका साकारली.