लॉकडाउनमध्ये आपापल्या घरीच बंदिस्त असलेले कलाकार सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात आहेत. फेसबुक लाइव्ह, इन्स्टा लाइव्ह यांच्या माध्यमातून हे सेलिब्रिटी चाहत्यांशी गप्पा मारत आहेत. सध्या अभिनेत्री रीना अगरवाल हिच्या एका इन्स्टा लाइव्हची जोरदार चर्चा आहे. कारण तिच्या या लाइव्हमध्ये भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची सरप्राइज एण्ट्री पाहायला मिळाली. युजवेंद्रची ही एण्ट्री कमेंटच्या स्वरुपात होती.
लॉकडाउनमध्ये रीना विविध बॉलिवूड व मराठी कलाकारांसोबत इन्स्टा लाइव्हद्वारे गप्पांचा कार्यक्रम करतेय. नुकतंच तिने युट्यूब स्टार धनश्री वर्मासोबत इन्स्टा लाइव्हचा कार्यक्रम केला. ट्रोलिंगवर या दोघींमध्ये चर्चा सुरू असताना युजवेंद्रने लाइव्हदरम्यान कमेंट पोस्ट केली. ‘ट्रोल्सचा आनंद घ्या’, असं लिहित त्याने हसण्याचा इमोजी पोस्ट केला. रीनाच्या इन्स्टा लाइव्हमध्ये युजवेंद्रची सरप्राइज एण्ट्री तिला व चाहत्यांना सुखद धक्का देऊन गेली.
View this post on Instagram
रीनाने आतापर्यंत अहाना कुमरा, गणेश हेगडे, डब्बू रत्नानी, रुपाली गांगुली, नीता लुल्ला तसंच मराठीतील शरद केळकर, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग यांसारख्या सेलिब्रिटींसोबत इन्स्टा लाइव्हद्वारे गप्पा मारल्या.