सध्या भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा चर्चेत आहे. त्याचे कारण त्याने वर्षाच्या पहिल्याच दिवशी केलेला साखरपुडा. सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविच हिला एका रोमँटिक डेटवर घेऊन जात त्याने तिला प्रपोझ केले. त्या पाठोपाठ भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत यानेही त्याची गर्लफ्रेंड इशा नेगी हिच्यासोबत फोटो पोस्ट केला होता. त्यावर चर्चा सुरू असतानाच भारताचा आणखी एका क्रिकेटपटूची लव्ह स्टोरी समोर येत आहे.

सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हल्ली कन्नड अभिनेत्री तनिष्का कपूरला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. वेस्ट इंडिज विरूद्धची मालिका संपल्यानंतर आणि श्रीलंके विरूद्धची मालिका सुरू होण्याआधी भारताचे कोणतेही सामने नव्हते. त्यामुळे सगळे क्रिकेटपटू आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत होते. त्याचवेळी युझवेंद्र चहल आणि तनिष्का कपूर यांनादेखील एकत्र भटकंती करताना पाहायला मिळाले. या दोघांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यामुळेच हे दोघे एकत्र भटकंती करतानाचे फोटो लगेच व्हायरल झाले.

 

View this post on Instagram

 

Be the sunshine

A post shared by TANISHKA KAPOOR (@therealkapooor) on

एका मुलाखती दरम्यान युझवेंद्र चहलने सांगितले होते की मी लवकरच लग्नासाठी कुर्ता शिवणार आहे. याच मुलाखतीतील एका वाक्यावरून चहलच्या घरी लवकरच लग्नाची सनई वाजणार आहे अशी चर्चा सुरू आहे.

कोण आहे तनिष्का कपूर ?

तनिष्काचा जन्म मुंबईतील आहे. त्यानंतर तिचे आई-वडिल कर्नाटकातील मंगलुरू येथे वास्तव्यास गेले. तिथे तनिष्काचा १६ वर्षे मुक्काम होता. त्यानंतर तनिष्का बंगळुरूला गेली आणि तिने अभिनयाचे धडे गिरवायला सुरूवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by TANISHKA KAPOOR (@therealkapooor) on

२०१५ मध्ये तनिष्काने आपला चित्रपट केला. उप्पी २ या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पणे केले. स्टार अभिनेता उपेंद्रचा हा पुनरागमनाचा चित्रपट होता. त्या चित्रपटात तनिष्काने सहाय्यक अभिनेत्रीची भुमिका केली होती. त्याच वर्षी तनिष्काला फर्स्ट रँक राजू या आणखी एका कन्नड चित्रपटातील भुमिका मिळाली. फर्स्ट रँक राजू या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे तिने वाहवा मिळवली. या चित्रपटानेही चांगलाच गल्ला कमावला. पण त्यानंतर गेली ३ वर्षे तनिष्का चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. त्यानंतर युझवेंद्र चहल बरोबरच्या प्रेमसंबंधांच्या चर्चांमुळे ती पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.