News Flash

‘देवमाणूस’ मालिकेत डॉ. अजितकुमार देवला लागणार झटका…

आता ही मालिका एका निर्णायक आणि रंजक टप्प्यावर आली आहे

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. हि मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय कारण या मालिकेतील सरू आज्जी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत.

आता ही मालिका एका निर्णायक आणि रंजक टप्प्यावर आली आहे. देवी सिंगला शोधण्यासाठी ACP दिव्या साम दाम दंड भेद ही सगळी अस्त्र वापरतेय. दिव्या हुशारीने अजितचे फिंगरप्रिंट्स मिळवते. रेश्माच्या घरातल्या तिसऱ्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंटसोबत अजितचे फिंगरप्रिंट मॅच होतात त्यामुळे दिव्या द्विधा मनस्थितीत आहे. पण आता दिव्याला प्रत्येक केसमध्ये असलेल्या व्यक्ती कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या प्रकारे अजितच्या संपर्कात आल्याचं लक्षात येतं.

त्यामुळे आता ACP दिव्या डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंगला कधी अटक करणार याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागलेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 1:34 pm

Web Title: zee marathi dev manus serial update avb 95
Next Stories
1 “किती लाजिरवाणं”; वादळात पडलेल्या झाडांसमोर डान्स केल्याने अभिनेत्री दीपिका सिंह ट्रोल
2 ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन
3 वयाच्या ५०व्या वर्षी ही मॉडेल झाली आई
Just Now!
X