News Flash

आता डॉ. निलेश साबळे म्हणणार ‘लाव रे तो व्हिडिओ’!!!!

जाणून घ्या सविस्तर...

करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. पण आता हळूहळू अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या घरी बसून सर्वजण कंटाळले आहेत. हा कंटाळा दूर करण्यासाठी आता ‘झी युवा’वर लवकरच एक नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘लाव रे तो व्हिडिओ’ असे या कार्यक्रमाचे नाव असून या नव्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका संयोजक डॉ. निलेश साबळे करणार आहे. महत्वाचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र  या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. घरबसल्या, अवघ्या महाराष्ट्राचे मनोरंजन करण्याची संधी महाराष्ट्रातील असंख्य कलाकारांना  मिळणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या अप्रतिम कार्यक्रमाचा सूत्रसंचालक, डॉक्टर निलेश साबळे, आता ‘झी युवा’ वाहिनीवर सुद्धा, कल्ला करण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या महाराष्ट्राचे मनोरंजन करू शकेल, सगळ्यांना पोट धरून हसायला लावेल, अशा टॅलेंटचा सध्या शोध सुरु आहे . पण या कार्यक्रमात आणखी एक खास सरप्राईज सुद्धा आहे. निलेश साबळेसोबत आणखी एक सेलिब्रिटी प्रत्येक भागात सहभागी होणार आहे.

‘लाव रे तो व्हिडिओ’ या कार्यक्रमातून, महाराष्ट्रातील लोकांचे छुपे टॅलेंट जे आजवर केवळ मोबाईल किंवा इंटरनेटवर दिसत होते आता ते लाखो करोडो लोकांना टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. एक आगळीवेगळी संकल्पना, प्रेक्षकांचा स्पर्धक म्हणून थेट सहभाग यामुळे, या कार्यक्रमाची रंगत अधिक  वाढणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 7:16 pm

Web Title: zee yuva nilesh sable upcoming show lav re to video avb 95
Next Stories
1 सुशांतची खिल्ली उडवणं शाहरुख-शाहिदला पडलं भारी; ‘त्या’ व्हिडीओमुळे केलं जातय ट्रोल
2 ‘मनोरंजनाच्या नावावर…’ सुशांतचा व्हायरल व्हिडीओ पाहून भडकली गायिका
3 सुशांत आणि रिया करणार होते लग्न? प्रॉपर्टी एजंटने केला खुलासा
Just Now!
X