मराठी गाणी.. मराठी कविता ह्याविषयी पुन्हा एकदा सर्व वयोगटात नुसती आवड नाही तर क्रेझ निर्माण करणारे सलील कुलकर्णी व संदीप खरे ह्या मराठीतील लोकप्रिय जोडीचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम आता १०००चा टप्पा गाठत आहे. हा १००० प्रयोग ई.टीव्ही मराठीवर २० जुलैला संध्याकाळी ७वाजता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. यामध्ये सलील कुलकर्णी, संदीप खरे याबरोबरच आर्या आंबेकर देखील गाणार आहे.
तरुण पिढीतील लोकप्रिय गायिका आर्या आंबेकर आणि पदार्पणातच पुरस्कार मिळवणारा लोकप्रिय बालगायक शुभंकर सलील कुलकर्णी ह्यांच्याकडूनच ‘आयुष्यावर बोलू काही’ मधील काही खास गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. सलील आणि संदीप ह्या कार्यक्रमात त्यांच्या लोकप्रिय कविता व गाण्यांबरोबरच काही नवीन कविता-गाणी सादर करणार असून खास १००० व्या प्रयोगासाठी केलेल नवीन गाणंसुद्धा सादर होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jul 2014 रोजी प्रकाशित
‘आयुष्यावर बोलू काही’ चा १००० वा प्रयोग
सलील कुलकर्णी, संदीप खरे याबरोबरच आर्या आंबेकर देखील गाणार आहे.

First published on: 19-07-2014 at 04:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1000 episode of ayushyavar bolu kahi