‘१९२१’ सिनेमाचा ट्रेलर पाहून तुम्हीही घाबराल

दिग्दर्शनाचा स्पेशल टच या ट्रेलरमध्ये दिसून येतो

मोठ्या पडद्यावर लवकरच विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘१९२१’ हा सिनेमा येतोय. हा चित्रपट यापूर्वी आलेल्या ‘१९२०’ या भयपटाचा हा सिक्वेल असेल. साहजिकच भयपटांचा चाहता असलेल्या प्रेक्षकांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. १९२१ चा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा आहे.

हा ट्रेलर पाहून आधीच्या सिनेमांपेक्षा हा सिनेमा अधिक भयावह असणार हे कळून येते. सिनेमात झरीन खान आणि करण कुंद्रा यांची मुख्य भूमिका आहे. करण कुंद्रा संगीताचे शिक्षण घेण्यासाठी भारतातून इंग्लंडमध्ये जातो. याठिकाणी त्याला अमानवी शक्तींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच करणचे आयुष्य अवघड होऊन बसते. अशावेळी झरीन खान त्याला या अमानवी शक्तींचा सामना करण्यास मदत करते.

यापूर्वीच्या ‘१९२०’ या सिनेमात अदा शर्मा आणि रजनीश दुग्गल यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे नव्या सिनेमाकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा असतील यात काही शंका नाही. विक्रम भट्ट यांच्या दिग्दर्शनाचा स्पेशल टच या ट्रेलरमध्ये दिसून येतो. दिग्दर्शनासोबत या सिनेमाची अजून एक जमेची बाजू म्हणजे सिनेमाचे संगीत.

रिलायन्स एण्टरटेनमेन्टच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरुन हा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिला असून अनेकांच्या पसंतीसही उतरला आहे. पण सिनेमा प्रेक्षकांना आवडतो की नाही, हे तर प्रदर्शनानंतरच कळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 1921 official trailer release zareen khan and karan kundra are trapped in a super natural web