नवीन वर्षांची सुरुवात झाल्यानंतर बॉलीवूड आणि मराठी चित्रपटांसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये स्क्रीन पुरस्कारांचे वेध लागतात. यंदाचा २१ वा वार्षिक लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळा १४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून यावर्षीच्या नामांकनांमध्ये सुपरस्टार, बिगबजेट चित्रपटांच्या तुलनेने छोटय़ा बजेटच्या परंतु, आशयसंपन्न हिंदी चित्रपटांनी बाजी मारली आहे. सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी ‘पीके’ या बिगबजेट, बहुचर्चित चित्रपटाबरोबरच कंगना राणावतच्या अभिनयाने गाजलेल्या ‘क्वीन’सह ‘अग्ली’, ‘हैदर’, ‘आँखो देखी’, ‘हायवे’ या चित्रपटांनी नामांकनात आघाडी घेतली आहे. सवरेत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या हिंदी चित्रपटांच्या दिग्दर्शकांना स्वाभाविकपणे सवरेत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्यामध्ये राजकुमार हिरानी, इम्तियाज अली, अनुराग कश्यप, विकास बहल, विशाल भारद्वाज, रजत कपूर यांचा समावेश आहे.
बॉलीवूड चित्रपटांसाठी पुरस्कार म्हटले की प्रेक्षकांना प्रचंड उत्कंठा असते ती सवरेत्कृष्ट अभिनेता व सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोण पटकावणार याची. यंदाच्या स्क्रीन पुरस्कारांमध्ये सवरेत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी बॉलीवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्रींमध्ये चांगलीच चुरस होणार आहे असे दिसते. दीपिका पुदकोण (फायंडिंग फॅनी), प्रियांका चोप्रा (मेरी कोम), राणी मुखर्जी (मर्दानी), आलिया भट्ट (हायवे), कंगना राणावत (क्वीन) आणि परिणीती चोप्रा (हँसी तो फँसी) या अभिनेत्रींमध्ये सवरेत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी रस्सीखेच होणार आहे.  
तर सवरेत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी आमिर खान (पीके), हृतिक रोशन (बँग बँग), रणदीप हुडा (हायवे), संजय मिश्रा (आँखो देखी), शाहरूख खान (हॅप्पी न्यू इयर), शाहीद कपूर (हैदर) आणि वरुण धवन (हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ) यांना नामांकन मिळाले आहे. बॉलीवूडचा रूपेरी पडदा एकेकाळी गाजविलेल्या अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने (डेढ इश्कियाँ) आणि जुही चावला (गुलाब गँग) यांना क्वचित खलनायकी छटेच्या नकारात्मक भूमिकेसाठी नामांकन मिळाले असून त्यांची स्पर्धा हुमा कुरेशी (डेढ इश्कियाँ) आणि मोना आंबेगावकर (मर्दानी) या अभिनेत्रींशी होणार आहे.
लोकप्रिय अभिनेता निवड पुरस्कारांमध्ये अजय देवगण, आमिर खान, रणवीर सिंग, शाहरूख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, हृतिक रोशन या सुपरस्टार कलावंतांसह शाहीद कपूर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन कपूर यांनाही नामांकन मिळाले आहे. तर लोकप्रिय अभिनेत्री निवड पुरस्कारांमध्ये कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, राणी मुखर्जी, करिना कपूर खान, कगंना राणावत, दीपिका पदुकोण या स्टार कलावंतांसह सोनम कपूर, परिणीती चोप्रा, जॅकलिन फर्नाडिस, अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट यांनाही नामांकन मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘फँड्री’, ‘रमा माधव’, ‘टपाल’, ‘विटी दांडू’ या मराठी चित्रपटांची नामांकनात बाजी
मराठी चित्रपटांसाठी दिल्या जाणाऱ्या स्क्रीन पुरस्कारांमध्ये सवरेत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी एकूण पाच मराठी चित्रपटांमध्ये रस्सीखेच होणार आहे. त्यामध्ये ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘फँड्री’, ‘रमा माधव’, ‘टपाल’ आणि ‘विटी दांडू’ या चित्रपटांचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे सवरेत्कृष्ट चित्रपटाच्या दिग्दर्शकांनाच सवरेत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कारासाठी नामांकन मिळते. परंतु, यंदाच्या स्क्रीन पुरस्कारांमध्ये सवरेत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्करासाठी गणेश कदम (विटी दांडू), नागराज मंजुळे (फँड्री), मृणाल कुलकर्णी (रमा माधव), महेश लिमये (यलो) आणि लक्ष्मण उतेकर (टपाल) यांना नामांकन मिळाले आहे. मराठी चित्रपटांसाठी यावर्षी सवरेत्कृष्ट बालकलाकार या गटातही पुरस्कार दिले जाणार असून गौरी गाडगीळ (यलो), निशांत भावसार (विटी दांडू), श्रुती काळसेकर (रमा माधव), सोमनाथ अवघडे (फँड्री) आणि विवेक चाबुकस्वार (सलाम) या बालकलावंतांना नामांकन मिळाले आहे.
मराठी चित्रपटांसाठीच्या सवरेत्कृष्ट अभिनेता गटामध्ये दिलीप प्रभावळकर (विटी दांडू), नाना पाटेकर (डॉ. प्रकाश बाबा आमटे), किशोर कदम (फँड्री), नंदू माधव (टपाल) आणि हृषिकेश जोशी (यलो) यांना नामांकन मिळाले असून सवरेत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी अमृता सुभाष (अस्तु), वीणा जामकर (टपाल), मृणाल कुलकर्णी (यलो), सोनाली कुलकर्णी (डॉ. प्रकाश बाबा आमटे) आणि उषा नाईक (एक हजाराची नोट) यांना नामांकन मिळाले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21st life ok screen award function
First published on: 11-01-2015 at 12:31 IST