राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-२०१९ सोहळा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात सोमवारी जल्लोषात पार पडला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वर्षभरात अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या कलाकरांचा गौरव करण्यात आला. आयुषमान खुरानाला (Ayushmann Khurrana) ‘अंधाधून’, तर विक्की कौशलला (Vicky Kaushal) ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेशला ‘महानती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सुरेखा सीकरी यांना ‘बधाई हो’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कार गौरवण्यात आलं.
विजेत्यांची संपूर्ण यादी-
- सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा: अंधाधून
- सर्वोत्कृष्ट पॉप्युलर सिनेमा: बधाई हो
- सामाजिक मुद्यावर भाष्य करणारा सर्वोत्कृष्ट सिनेमा- पॅडमॅन
- सर्वोत्कृष्ट अभिनेता: आयुषमान खुराना (अंधाधून) आणि विक्की कौशल (उरी)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कीर्ति सुरेश (महानती, तेलुगू)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : शिवानंद किरकिरे (चुंबक)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : सुरेखा सीकरी (बधाई हो)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – आदित्य धर (उरी: द सर्जिकल स्ट्राइक)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी यकंती (नाळ)
- सर्वोत्कृष्ट गायक – अरिजीत सिंह (पद्मावत)
- सर्वोत्कृष्ट गायिका- बिंदू मालिनी
- सर्वोत्कृष्ट गीत : बिंते दिल (पद्मावत)
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – संजय लीला भंसाली (पद्मावत)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – शाश्वत सचदेवा (उरी)
- सर्वोत्कृष्ट साउण्ड डिझाइन: बिश्वदीप दीपक (उरी)
- बेस्ट फिल्म क्रिटिक: ब्ले जानी आणि अनंत विजय
- बेस्ट लिरिक्स- नितिचारमी (कन्नड फिल्म)
- मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट: उत्तराखंड
- बेस्ट स्पेशल इफेक्ट्स: ‘KGF’ आणि ‘Awe’
- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक : क्रूति महेश मिद्या (पद्मावत (घूमर गाणं))
- सर्वोत्कृष्ट संवाद – तारीख (बंगाली)
नॉन फिक्शन फिल्म : –
- स्पेशल मेन्शन अवॉर्ड- महान हुतात्मा- सागर पुराणिक
- ग्लो वॉर्म इन ए जंगल- रमण दुंपाल
- लड्डू- समीर साधवानी आणि किशोर साधवानी
- बेस्ट नरेशन – मधुबनी- द स्टेशन ऑफ कलर
- आवाज- दीपक अग्निहोत्री, उर्विजा उपाध्याय
- बेस्ट म्यूजिक फिल्म- ज्योति- डायरेक्टर केदार दिवेकर
- बेस्ट ऑडियोग्राफी चिल्ड्रन ऑफ द सॉइल- बिश्वदीप चटर्जी
- बेस्ट लोकेशन साउंड- द सिक्रेट लाइफ ऑफ फ्रॉग्स- अजय बेदी
- बेस्ट सिनमॅटॉग्राफी- द सिक्रेट लाइफ ऑफ फ्रॉग्स – अजय बेदी आणि विजय बेदी
- बेस्ट बीट डायरेक्शन- आई शपथ- गौतम वजे
- बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यू- चलो जीते हैं- मंगेश हडावले
- बेस्ट शॉट फिक्शन फिल्म- कासव- आदित्य सुभाष जंभाळे
- सोशल जस्टिस फिल्म- व्हाय मी- हरीश शाह
- सोशल जस्टिस फिल्म- एकांत- नीरज सिंह
- बेस्ट इन्वेस्टिगेटिव फिल्म- अमोली- जॅसमिन कौर आणि अविनाश रॉय
- बेस्ट स्पोर्ट्स फिल्म- स्विमिंग थ्रू द डार्कनेस- सुप्रियो सेन
- बेस्ट एज्युकेशनल फिल्म- सरला विरला- एरेगोडा
- बेस्ट फिल्म ऑन सोशल इशू- ताला ते कूंजी- शिल्पी गुलाटी
- बेस्ट एनवायरमेन्टल फिल्म- द वर्ल्ड्स मोस्ट फेमस टायगर- सुबिया नालामुथु
- बेस्ट प्रमोशनल फिल्म- रीडिस्कवरिंग जाजम- अविशान मौर्य आणि क्रिती गुप्ता
- बेस्ट आर्ट्स अँड कल्चरल फिल्म- बुनकर: द लास्ट ऑफ द वाराणसी वीवर्स- सत्यप्रकाश उपाध्याय
- बेस्ट डेब्यू नॉन-फीचर फिल्म ऑफ ए डायरेक्टर- फलूदा- साग्निक चटर्जी
- बेस्ट नॉन-फीचर फिल्म (शेयर्ड)- सन राइज – विभा बख्शी