आता हेच बाकी होतं, ‘पिया’ आणि त्याची ‘पहरेदार’ जाणार हनिमूनला

मालिकेत नऊ वर्षांचा रतन आणि अठरा वर्षांची दिया जाणार हनिमूनला

pehredar piya ki
'पहरेदार पिया की' मालिका पुन्हा एकदा चर्चेत

सोनी टिव्हीवर १७ जुलैपासून सुरु झालेली मालिका ‘पहरेदार पिया की’ पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. मालिकेसंदर्भात अनेक वादविवादही झाले. याचं कारण म्हणजे मालिकेचं न पटणारं कथानक. एका १८ वर्षीय तरूणीचं ९ वर्षांच्या मुलाशी होणारं लग्न आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेलं या नात्यातील रहस्य हा या मालिकेचा विषय आहे. आता पुन्हा या मालिकेचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे येत्या काळात मालिकेत दाखवण्यात येणारं कथानक.

नऊ वर्षीय रतन (अफान खान) आणि १८ वर्षीय दिया (तेजस्वी प्रकाश) यांचं मालिकेत लग्न झालेलं दाखवलंय. मात्र यापुढे आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे हे दोघेही आता हनिमूनला जाणार आहेत. मालिकेच्या निर्मात्यांनीच तसा निर्णय घेतलाय. टीआरपी मिळवण्यासाठी मालिकेत असा मूर्खपणा दाखवण्यात येणार असल्याने अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हनिमूनचा हा भाग लंडनमध्ये शूट होणार असल्याचीही माहिती मिळतेय.

वाचा : पतीसोबत व्हिडिओ चॅट करताना या मॉडेलने घेतला गळफास

सध्याच्या काळात एका नऊ वर्षीय मुलाचं लग्न १८ वर्षीय मुलीसोबत दाखवणं कितपत योग्य आहे यावर आधीच अनेक चर्चा झाल्या. त्यात भर म्हणून आता हे दोघे हनिमूनला जाणार असं मालिकेत दाखवणार असल्यास प्रेक्षकांना किती मूर्खात काढायचं, असाच सवाल अनेकजण करत आहेत. यासंदर्भातील एक नवीन प्रोमोसुद्धा शूट करण्यात आलाय.

जाणून घ्या रिअॅलिटी शोसाठी बिग बी, शाहरुख, सलमान यांना मिळणाऱ्या मानधनाचा आकडा

‘पहरेदार पिया की’ मालिकेच्या कथानकावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाल्या. सोशल मीडिया व्यतिरिक्त काही टेलिव्हिजन कलाकारांनीही मालिकेला विरोध दर्शवला. अभिनेता करण वाहीनंही फेसबुकच्या माध्यमातून मालिकेला विरोध केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 9 year old ratan and 18 year old diya to go for honeymoon in pehredaar piya ki tv serial

ताज्या बातम्या