रणवीर सिंग आणि सारा अली खान यांच्या ‘आंख मारे’ या गाण्याच्या तालावर आजवर अनेक सेलिब्रिटींना नाचताना तुम्ही पाहिलं असेल. मात्र ९३ वर्षांच्या आजीबाईंचा डान्स तुम्ही पाहिला आहे का? सोशल मीडियावर सध्या एक ९३ वर्षांची आजी आपल्या डान्समुळे चर्चेत आहे. या आजीने ‘आंख मारे’ या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील चकित व्हाल.
अवश्य पाहा – सेम टू सेम; हुबेहुब WWE सुपरस्टार्ससारखे दिसतात हे सेलिब्रिटी
तारक मेहतामध्ये ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीची एण्ट्री; साकारणार अंजली भाभीची भूमिका
कोलकातामधील गौरव साहा यांनी आपल्या आजीच्या ९३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत आजीबाईंनी ‘आंख मारे’ या गाण्यावर डान्स केला. त्यांना आनंदाने नाचताना पाहून कुटुंबातील सर्वच जण आश्चर्यचकित झाले होते. गौरव साहा यांनी हा व्हिडीओ आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना इतका आवडला की फेसबुकवरुन थेट ट्विटर, युट्बूब, इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होऊ लागला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तब्बल १२ लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.
‘आंख मारे’ हे गाणं ‘सिंबा’ या चित्रपटातील आहे. हा चित्रपट २०१८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. रोहित शेट्टी याने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हे गाणं त्यावेळी प्रचंड चर्चेत होतं. लग्न, पार्टी, तसेच कुठल्याही समारंभात हे गाणं आवडीने वाजवलं जायचं.
