परिणिती चोप्रा ही उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती गाणीसुद्धा छान गाते. अभिनयासोबतच तिच्या गायनकौशल्याचंही अनेकदा कौतुक होतं. परिणितीने चित्रपटांमध्ये पार्श्वगायनसुद्धा केलं आहे. तिने गायलेल्या एका गाण्याला चक्क ऑस्कर विजेता संगीतकार व गायक ए. आर. रेहमान यांनी दाद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बॉम्बे’ या चित्रपटातील ए. आर. रेहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘तू ही रे’ या गाण्याच्या काही ओळी परिणितीने गुणगुणल्या. त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला. परिणितीच्या या गाण्यावर नेटकऱ्यांकडून स्तुतीसुमनांचा पाऊस पडला. एका नेटकऱ्याने तर ए. आर. रेहमान यांना टॅग करून परिणितीचा हा व्हिडीओ शेअर केला. ‘नवीन गायिका’ असं कॅप्शन देत त्या युजरने ट्विटरवर परिणितीचा व्हिडीओ शेअर केला. या ट्विटरला उत्तर देत ए. आर. रेहमान यांनी परिणितीने गायलेल्या गाण्याला दाद दिली.

आपल्या संगीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांच्याकडून दाद मिळणं परिणितीसाठी अर्थातच खूप मोठी गोष्ट आहे. परिणितीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तिचा ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट प्रदर्शित व्हायचा आहे. पण सध्या करोना विषाणूचे सावट असल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A r rahman appreciates parineeti chopra tu hi re song ssv
First published on: 23-03-2020 at 16:12 IST