या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा आमिर आणणार रिमेक

‘लाल सिंग चड्डा’ असं आमिरच्या नव्या चित्रपटाचं नाव असणार आहे.

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीरच्या आगामी चित्रपटाबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. आमिरनं त्याच्या वाढदिवशी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. आमिर १९९४ सालच्या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक घेऊन पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ऑस्कर विजेत्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा रिमेक घेऊन आमिर येत आहे. ‘आमिर खान प्रोडक्शन’ अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. ‘लाल सिंग चड्डा’ असं आमिरच्या नव्या चित्रपटाचं नाव असणार आहे. अद्वेत चंदन या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत. ५४ व्या वाढदिवसानिमित्तानं आमिरनं ऑस्कर विजेत्या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक येत असल्याची घोषणा केली आहे.

पॅरामाऊंट फिल्मकडून या चित्रपटाचे हक्क विकत घेतले असल्याचंही आमिरनं सांगितलं. सप्टेंबर २०१९ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे अशी माहिती आमिरनं दिली. या चित्रपटाची कथा अतुल कुलकर्णी लिहिणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aamir khan announced he is remaking 1994 oscar winning film

ताज्या बातम्या