बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (डीडीएलजे) या सुपरहिट चित्रपटातील एक बहुचर्चित डॉयलॉग बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानने एका जाहिरातीसाठी वापरला आहे. स्नॅपडील या ऑनलाईन विक्री संकेतस्थळाच्या एका जाहिरातीत शाहरुखच्या ‘डीडीएलजे’मधील ‘पलट..पलट’ या डायलॉगचा आधार घेऊन शायरी तयार करण्यात आली आहे. ही शायरी आमीर खान या जाहिरातीत अतिशय खुबीने वापरताना दिसतो. शायरीवर आमीर खान उपस्थित मित्रांची वाहवा देखील मिळवतो. स्नॅपडीलच्या या जाहिरातीतून दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना देण्यात येणाऱया ऑफर्सची प्रसिद्धी करण्यात आली आहे.
आमिर म्हणतो, ‘खडे रहे हम, वो पलटी नही..खडे रहे हम वो पलटी नही..ऐसा भी क्या है उनके फोन मैं की, शाहरुख की लाईन उनपर चलती नही?’
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2015 रोजी प्रकाशित
आमिरने उसना घेतला शाहरुखचा डायलॉग
'खडे रहे हम, वो पलटी नही..खडे रहे हम वो पलटी नही..ऐसा भी क्या है उनके फोन मैं की...
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 28-10-2015 at 17:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan borrows shah rukh khan palat palat dialogue from ddlj for new commercial