अभिनेता आमीर खान याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार अभियानासाठी ११ लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती ओढावली असल्याने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारतर्फे ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात येत आहे.
आमीर खानने केलेल्या या मदतीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटद्वारे त्याचे आभारही मानले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटवरून माहिती देताना आमीर खानने जलयुक्त शिवार अभियानाला मदत केल्याचे जाहीर केले. जलयुक्त शिवार अभियानासाठी आमीर खानने ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्त केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा होणाऱ्या या पैशातून जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहे.
जलयुक्त शिवार ही पाणलोट योजना आहे. यामध्ये तालुक्यातील काही टँकरग्रस्त गावांची निवड केली जाते. जलयुक्त शिवार अभियानामध्ये गावातील ओढे, नाले खोल खणून पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2015 रोजी प्रकाशित
‘जलयुक्त शिवार’ अभियानाला आमीरची मदत; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
अभिनेता आमीर खान याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार अभियानासाठी ११ लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे.

First published on: 22-08-2015 at 02:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan contribution of 11 lakhs for jalyukt shivar abhiyaan