scorecardresearch

आमीर खान आज कोल्हापुरात

आमीर खान याच्या दौऱ्याला चौगुले यांनी दुजोरा दिला.

आमीर खान आज कोल्हापुरात
आमिर खान

प्रख्यात अभिनेता आमीर खान ‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पाश्र्वभूमीवर उद्या (सोमवारी) कुस्तीसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात येणार आहे. हिंदकेसरी दादू चौगुले मार्गदर्शन करत असलेल्या मोतीबाग तालमीला तो भेट देणार आहे. तत्पूर्वी, चौगुले यांच्या निवासस्थानी तो खास बनवलेली कोल्हापुरी थंडाई चाखणार आहे.

आमीर खान याच्या दौऱ्याला चौगुले यांनी दुजोरा दिला. एक चोखंदळ अभिनेता अशी आमीर खान याची सिनेजगतात ओळख आहे. तूर्तास, सध्या चच्रेत असलेल्या ‘दंगल’ या चित्रपटामध्ये आमीर खान कुस्तीपटू महावीरसिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. महत्त्वाकांक्षी वडिलांची त्यांच्या मुलींना प्रोत्साहन देण्याची सत्यकथा या चित्रपटात साकारण्यात आली आहे.

नीतेश तिवारी दिग्दíशत या चित्रपटामध्ये रसिकांना आमीर खान विविध रूपांमध्ये दिसणार आहे. ‘म्हारी छोरिया छोरोसे कम हैं के’, असे म्हणणारा आमीर खान या चित्रपटाद्वारे २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

असा हा आमीर ‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पाश्र्वभूमीवर उद्या कोल्हापुरात येणार आहे . आमीर खानला कोल्हापूरला येण्यासाठी  हिंदकेसरी दादू चौगुले यांनी निमंत्रण दिले होते.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2016 at 00:07 IST

संबंधित बातम्या