बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्टने आता इन्स्टाग्रामवरही हजेरी लावली आहे. इन्स्टाग्राम ही सोशल साइट फोटो शेअर करण्यासाठी वापरली जाते.
आमिरने नुकतेच ‘इन्स्टाग्राम’वर दोन फोटो टाकले आहेत. पहिल्या फोटोत आमिर खान आपल्या दिग्दर्शक पत्नी किरण रावसोबत दिसतो. या फोटोसहीत त्याने ‘माझी पत्नी… माझं जीवन… माझं सगळं काही…’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका फोटोत तो काही मुलांच्या घोळक्यात उभा आहे. आमिर खान फेसबुक आणि ट्विटरवर अॅक्टिव आहेच. पण, तो म्हणतो ‘ट्विटरसाठी माझ्याकडे फारसा वेळ नाही… केवळ छोट्या दोन बॉक्समध्ये आपले फोटो टाकण्याचा वेळ आहे… जे माझ्या नियमित दिवसांना दाखवतात… गुड मॉर्निंग’.
इन्स्टाग्रामवर सोनम कपूर, बिपाशा बासू यांव्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटी अगोदरपासूनच अॅक्टिव्ह आहेत. त्यात आता आमिर खानचेही नाव सामिल झाले आहे.

Story img Loader