आमीरला ‘मुन्नाभाई’मधला ‘सरकीट’ साकारण्याची इच्छा?

बॉलीवूडचा ‘मि.परफेक्शनिस्ट’ आमीर खानने ‘मुन्नाभाई’ चित्रपटाच्या तिसऱया सिक्वलमध्ये ‘सरकीट’चे किरदार साकरण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

बॉलीवूडचा ‘मि.परफेक्शनिस्ट’ आमीर खानने ‘मुन्नाभाई’ चित्रपटाच्या तिसऱया सिक्वलमध्ये ‘सरकीट’चे किरदार साकरण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी आमीर खानसोबत ‘थ्री इडियट्स’ध्ये काम केले आहे. नुकतेच या दोघांनी ‘पी.के’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटासाठी एकत्र काम केले आहे. ‘पी.के’ चित्रपटावरून सध्या प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान, या चित्रपटाचे चित्रीकरण करताना दिग्दर्शनक राजकुमार हिरानी आणि आमीर यांच्यामध्ये झालेल्या सविस्तर चर्चेत खुद्द आमीरने हिरानी यांच्याकडे ‘मुन्नाभाई’च्या येत्या सिक्वलमध्ये ‘सरकीट’ची भुमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते.
यापूर्वी ‘मुन्नाभाई’ चित्रपटांच्या सर्व सिक्वल्समध्ये अभिनेता अरशद वारसी याने ‘सरकीट’ची भूमिका साकरली आहे.
आमीर खानची ही कल्पना चित्रपटात मुख्य भुमिका साकारणारा अभिनेता संजय दत्तला देखील आवडली होती अशी चर्चा आहे. आमीर आधीपासूनच ‘मुन्नाभाई’तील ‘सरकीट’च्या किरदारचा चाहता राहिला आहे आणि भविष्यात ‘मुन्नाभाई’चा सिक्वल होणार असेल तर, ‘सरकीट’ची भूमिका साकरण्याची इच्छाही त्याने आपल्याजवळ व्यक्त केली असल्याची पुष्टी खुद्ध हिरानी यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aamir khan wants to play circuit from munnabhai series

ताज्या बातम्या