घटस्फोट घेतल्यानंतरही आमिर- किरण एकत्र शूट करत आहेत- मित्राने केला खुलासा

आमिर आणि किरणचा जवळचा मित्र अमीन हाजीने याबाबत खुलासा केला आहे.

Kiran Rao, amin hajee on aamir khan and kiran rao divorce, Amin Hajee, aamir khan and kiran rao friend amin hajee, Aamir Khan and Kiran Rao Divorce, Aamir Khan and Kiran Rao, Aamir Khan,
अमीन आणि आमिर हे जवळपास गेली २० वर्षे मित्र आहेत.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी लग्नाच्या जवळपास १५ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याची माहिती दिली. त्यांची ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला होता. आता आमिर आणि किरणचा जवळचा मित्र अमीन हाजीने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आज सकाळी ते दोघे एकत्र चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत असे सांगितले आहे.

अमीन आणि आमिर हे जवळपास गेली २० वर्षे मित्र आहेत. त्यांनी ‘लगान’ आणि ‘मंगल पांडे’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले. आता अमीनने ‘दैनिक भास्कर’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘लॉकडाउनच्या काळात किरण आणि आमिरमध्ये वाद सुरु झाले. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये मला याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर मला वाईट वाटले. मी आमिर आणि किरणला खूप वर्षांपासून ओळखतो. माझ्या लग्नाच्या सहा महिने आधी त्यांनी लग्न केले होते’ असे अमीन म्हणाला.

आणखी वाचा : आमिर खान-किरण राव घटस्फोट : मुलगी इरा खानची पहिली पोस्ट; म्हणाली…

अमीनने नंतर किरण आणि आमिर हे सध्या एकत्र चित्रीकरण करत असल्याचे सांगितले आहे. ‘तुम्हा ऐकून आश्चर्य वाटेल की आज घटस्फोटाची घोषणा केल्यानंतरही ते दोघे कारगिल येथे लाल सिंह चड्ढा चित्रपटाचे चित्रीकरण एकत्र करत आहेत. किरण त्या चित्रपटाची निर्माती आहे. जर त्या दोघांमध्ये भांडणे होत असती तर त्यांनी एकत्र काम केले असते का? अजीबात नाही’ असे अमीन म्हणाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aamir khans friend ameen haji reaction on his seperation with kiran rao avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या