सध्या लॉकडाउनमुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मला प्रचंड मागणी आहे. त्यातून अनेक नवे विषय, नवीन प्रवाह आणि नवी मांडणी समोर येत आहे. आशिष निनगुरकर यांनी लिहीलेला ‘आरसा’ हा सामाजिक लघुपट नुकताच ‘हंगामा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आरसा’ ही एका मुलीची गोष्ट आहे. त्या मुलीच्या आईला कॅन्सर असतो. अशावेळी ती आईला वचन देते. ते वचन पूर्ण करताना तिचा प्रियकर तिला सोडून जातो. तिच्या या संपूर्ण प्रवासातून अनमोल संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.

आणखी वाचा : विजय तेंडुलकरांच्या ‘झाला अनंत हनुमंत’ नाटकावर चित्रपट

या लघुपटाचे दिग्दर्शन गणेश मोडक यांनी केले असून संकलन हर्षद वैती यांचे आहे. छायांकन योगेश अंधारे यांचे असून या लघुपटात श्वेता पगार, चैत्रा भुजबळ, संकेत कश्यप, गीतांजली कांबळी, वैष्णवी वेळापुरे व डॉ. स्मिता कासार यांनी भूमिका साकारल्या आहेत. आशिष निनगुरकर यांनी या लघुपटाचे लेखन केले असून ‘काव्या ड्रीम मूव्हीज व सौ.किरण निनगुरकर’ यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. ‘आरसा’ हा लघुपट कॅन्सर रोगाबद्दल जनजागृती करणारा आहे. ‘आरसा’ लघुपटाने याअगोदर विविध फेस्टिवलमध्ये नामांकने व पुरस्कार पटकावले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarsa short film to stream on hungama play ssv
First published on: 06-09-2020 at 13:36 IST