अभिनेत्री सायली संजीव हिची मुख्य भूमिका असलेला ‘आटपाडी नाईट्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरवरुन या चित्रपटामध्ये कॉमेडीचा मोठ्या प्रमाणावर भरणा करण्यात येणार असल्याचं दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये वसंत बापूसाहेब खाटमोडे (अभिनेता प्रणव रावराणे) हा युवक आपल्या मित्रांसोबत भविष्य जाणून घेण्यासाठी एका ज्योतिषाला हात दाखवतोय, त्यावर तो ज्योतिष वसंताचा विवाह येत्या २० दिवसात होण्याचा बेत असल्याचे सांगतो. मात्र लग्न झालं तरी तुमचा रात्रीचा काहीतरी घोळ आहे’ हे वाक्य ज्योतिष आवर्जुन सांगतो. विशेष म्हणजे हेच वाक्य चित्रपटाची उत्कंठा वाढवतो. त्यातच चित्रपटामध्ये अभिनेत्री सायली संजीवची एण्ट्री होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aatpadi nights teaser out sayali sanjiv and pranav raorane ssj
First published on: 06-12-2019 at 15:34 IST