‘हीरामंडी’ या संजय लीला भन्साळींच्या वेब सीरिजची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. १ मे रोजी ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. त्याचे आठ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

बॉलीवूडमधील सहा अभिनेत्रींना एकत्र घेऊन, तयार झालेली ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. या वेब सीरिजमधील एक अभिनेत्री अशी आहे की, जिला शूटिंगदरम्यान संजय लीला भन्साळींनी लंच ब्रेक देण्यास मनाई केली होती. ती अभिनेत्री म्हणजे अदिती राव हैदरी. याबाबत अदिती राव हैदरीनं एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा… VIDEO: “श्रद्धा वहिनी झाडू घेऊन…”, ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीची भन्नाट रील व्हायरल, चाहते म्हणाले…

‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत अदिती राव हैदरी म्हणाली, “पहिल्या मुजऱ्याच्या शूटिंगदरम्यान हे झालं होतं. आम्ही ‘हात होजाओ’पासून शूटची सुरुवात केली; जो मी केलेला पहिला मुजरा होता. मी तेव्हा नुकतीच कोविडच्या आजारातून बरी झाली होती. पहिल्या दिवसाच्या शेवटी पोशाख खूपच जड होता आणि ते सहन करण्याची ताकद माझ्यात नव्हती. ते मला काय सांगत होते, ते मी पाहू शकत होते, समजू शकत होते; परंतु माझ्यानं ते होतच नव्हतं. पण, ते जे काही म्हणत होते ते अर्थपूर्ण होतं.”

अदिती पुढे म्हणाली, “मी खूप निराश झाले होते. कारण- मला माहीत होतं की, त्यांना जसा शॉट हवाय तसा तो मिळाला नव्हता. परंतु, त्या दिवसाच्या शेवटी आम्हाला हवा तसा शॉट मिळाला. इथे मला हे सांगायचंय की, त्यांचा आमच्यावर विश्वास होता आणि मला त्या विश्वासाला कधी तडा जाऊ द्यायचा नव्हता.”

हेही वाचा… “माझ्या आईने त्याला खूप झापलं होतं”, ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ फेम रोहित राऊतला ओरडली होती जुईलीची आई; गायकाने सांगितला सासूबाईंचा किस्सा

“एके दिवशी आम्ही दोन-तीन टेक केले आणि त्यांनी मला नम्रपणे बोलावलं आणि माझ्याशी ते बोलू लागले आणि मी एका वेगळ्याच विश्वात गेले. ते खूप सुंदर बोलतात. मनापासून बोलतात. तो बोलत असतानाच माझ्या डोळ्यांतून अश्रू आले. ते मला म्हणाले की, आपण हा सीन शूट करणार आहोत आणि तू सोडून मी सगळ्यांना लंच ब्रेक दिला आहे. तुला चालेल ना? मी त्यांना म्हणाले. हो नक्की चालेल. तेव्हा मी जेवले नाही आणि मला खरोखर मदत झाली. त्यामुळे मी गळून न पडता, कणखर राहिले. नंतर मी माझ्या व्हॅनमध्ये गेले आणि ते मला जे काही बोलले त्याचा विचार केला. त्यानंतर मी परत शूटसाठी आले. आम्ही शूट केलं आणि ते शूट ओके झालं,” असंही अदिती म्हणाली.

हेही वाचा… “आता शोभतोयस खरा फिल्टरपाड्याचा बच्चन”, गौरव मोरेचा नवा लूक पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ ही वेब सीरिज ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लाहोरमधील हीरा मंडीच्या रेड-लाइट जिल्ह्यातील तवायफांच्या (वेश्यांच्या) जीवनावर आधारित आहे. अदिती राव हैदरीसह या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्ढा, संजीदा शेख, फरदीन खान आदी कलाकार आहेत. या वेब सीरिजचा पहिला सीजन १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.