scorecardresearch

मला काम करुन ट्रोल व्हायला आवडेल- अभिजीत खांडकेकर

लोकसत्ताच्या डिजिटल अड्डा या कार्यक्रमात त्याने ट्रोलिंगवर मत मांडले आहे.

abhijeet khandkekar, loksatta digital adda, digital adda, trolling,
अभिजीतची ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आजकाल अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आगामी प्रोजेक्ट विषयी किंवा खासगी आयुष्या विषयी माहिती देताना दिसतात. पण याच कलाकारांना अनेकदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर सर्वांचा लाडका ‘गुरुनाथ सुभेदार’ उर्फ अभिजीत खांडकेकरने त्याचे मत मांडले आहे. अभिजीतची ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यानिमित्ताने त्याने लोकसत्ताच्या डिजिटल अड्डा या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर मुलींना एखादी पोस्ट शेअर करताना किती काळजी घ्यावी लागते हेदेखील सांगितले आहे.

‘आम्ही काही नाही केलं तरी ट्रोल होत असतो. त्यामुळे मला तरी वाटतं की काही तरी करुन तरी ट्रोल व्हावं. आपल्याला फुकटचा डेटा मिळालाय आणि आपण काही तरी वेगळी कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधण्याचे काम अनेक लोकं करत असतात. मला असं वाटतं की त्यांनी त्यांचे काम करावं, मी माझं काम करत राहीन. फक्त जर कुणी अश्लिल भाषेमध्ये, स्त्रीयांना अपमानास्पद असेल असे काही टाकत असेल तर मी ते कधीच खपून घेत नाही. मी ते आधी डिलिट करतो’ असे अभिजीत म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-06-2021 at 19:04 IST