‘धूम ३’ चे टायटल साँग नुकतेच लाँच करण्यात आले आहे. यावेळी आमिर आणि कतरिना हे दोघेही लाँचसाठी उपस्थित होते. मात्र, धूम ३मधला मुख्य भूमिकेतील अभिनेता अभिषेक बच्चन यावेळी दिसलाच नाही. अभिषेकला या कार्यक्रमात बोलवण्यातच आले नाही, शिवाय कार्यक्रमाची माहितीदेखील त्याला देण्मयात आलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अभिषेकला या कार्यक्रमाची माहिती इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साइट्सवरून मिळाली. वानखेडे स्टेडियममध्ये आमिर सचिनचा सामना पाहायला गेला म्हणून या कार्यक्रमात उशिरा पोहोचल्याची बातमी त्या वेळी सर्वत्र होती. चित्रपटाच्या फस्ट लूक लाँचिंग कार्यक्रमात त्याला बोलावले होते आणि त्यात तो सहभागीदेखील झाला होता. त्या कार्यक्रमात आमिरदेखील उपस्थित होता. मात्र, या वेळेस अभिषेक शहरात असूनही या कार्यक्रमात सहभागी झाला नसल्याने लोक चकित आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2013 रोजी प्रकाशित
‘धूम ३’च्या टायटल साँग लाँचमधून अभिषेक गायब
'धूम ३' चे टायटल साँग नुकतेच लाँच करण्यात आले आहे. यावेळी आमिर आणि कतरिना हे दोघेही लाँचसाठी उपस्थित होते.
First published on: 19-11-2013 at 12:44 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan unaware of dhoom 3 title song launch