बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या वेब सीरिज, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच त्याची ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर आता लवकरच तो ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात झळकणार आहे. अभिषेकने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून या सेटवरील त्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटाचं कोलकाता येथे चित्रीकरण सुरु असून या सेटवरचा अभिषेकचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो अभिषेकच्या एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. येत्या ९ डिसेंबरपर्यंत या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

या फोटोमधील अभिषेकचा लूक पाहता त्याला ओळखणं कठीण आहे. यापूर्वी अभिषेकचा विमातळावरील फोटो व्हायरल झाला होता. यावेळी तो कोलकातासाठी रवाना होत असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, अभिषेकने या आधी लुडो या चित्रपटाच काम केले. करोना काळामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan upcoming film bob biswas shooting started dcp98
First published on: 26-11-2020 at 17:42 IST