अभिनेता रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉय सध्या त्यांचा आगामी सिनेमे बँक चोरच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. प्रमोशनशी निगडीत एका कार्यक्रमात रितेश देशमुखला त्याची खिल्ली उडवून घ्यायची असाचा कार्यक्रमाचा आराखडा रचण्यात आला होता. यावरून पत्रकारांनी त्याची खिल्ली उडवायला सुरूवात केली. आता पत्रकारच खिल्ली उडवतात म्हटल्यावर विवेक तरी कसा शांत बसेल. त्यानेही पत्रकारांमध्ये सहभागी होऊन रितेशला चार शब्द सुनवलेच.
रितेश मराठी कोट्याचा वापर करून हिंदी सिनेसृष्टीत आला असे विवेकने या कार्यक्रमात म्हटले. एवढंच बोलून तो थांबला नाही तर विवेक म्हणाला की, ‘रितेशने आर्किटेक्टचे शिक्षण घेतले आहे. पण बरं झालं रितेश सिनेसृष्टीत आला. २००- २५० रुपयांचे नुकसान आपण सहन करू शकतो पण जर तो आर्किटेक्ट झाला असता तर किती रुपयांचं नुकसान झालं असतं याचा अंदाजही बांधता येणार नाही.’
परिणीती, का खोट बोलते आहेस? फेसबुकच्या माध्यमातून वर्गमित्राचा सवाल
तर दुसरीकडे पत्रकारांनी त्याच्या ‘हमशकल्स’ आणि ‘डू नॉट डिस्टर्ब’ या सिनेमांमध्ये काम केल्याबद्दल त्याच्यावर भरपूर टीका केली. गेली १५ वर्ष प्रेक्षक तुला फक्त सहन करत आहेत. तुला अभिनय येत नाही अशा प्रकारची टीका रितेशवर होत राहिली आणि तो ही सर्व टीका एका खुर्चीवर बसून ऐकत होता.
आता तुम्ही म्हणाल की, तो हे सगळं का ऐकतं होता? त्याने यावर काही प्रतिक्रिया का नाही दिली. तर या प्रमोशनचा फंडाच हा होता की सर्वांनी मिळून रितेशची खिल्ली उडवायची आणि रितेशने ती ऐकून घ्यायची.
विवेक ओबेरॉय आणि रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन बंपी याने केल असून सिनेमाची निर्मिती यश राज बॅनरचे यूथ प्रॉडक्शन हाऊस ‘व्हाय- फिल्म्स’ करत आहे. ‘व्हाय- फिल्म्स’ने याआधी ‘मॅन्स वर्ल्ड’, ‘बँड बाजा बारात’ आणि ‘लेडिज रूम’ यांसारख्या वेब सिरीजची निर्मिती केली आहे. येत्या १६ जूनला हा सिनेमाला प्रदर्शित होणार आहे. ‘बँजो’ सिनेमानंतर रितेश देशमुख ‘बँक चोर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बँजो’ सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नव्हता. त्यामुळे या सिनेमात तरी रितेशची जादू चालेल का, हा एक मोठा प्रश्न आहे.