कलाविश्वात कलाकारांच्या कामापेक्षा त्यांच्या पर्सनल लाइफविषयी बऱ्याच चर्चा रंगत असतात. यामध्ये कलाकारांचे ब्रेकअप-पॅचअप या चर्चा तर हामखास ठरलेल्या असतात. आतापर्यंत अनेक कलाकार त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे या चर्चा सुरुवातीच्या काळातही तितक्याच रंगायच्या. यातलीच एका कलाकार जोडप्याची लव्हस्टोरी प्रचंड चर्चेत आली होती. ही जोडी म्हणजे दिवंगत अभिनेत्री परवीन बाबी आणि अभिनेता डॅनी डॅन्झोपा. आपल्या मादक सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासोबत डॅनी जवळपास चार वर्षे एकत्र राहात होते. मात्र पुढे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय  घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘फिल्मफेअर’ने त्यांच्या एका मुलाखतीतील भाग प्रसिद्ध केला होता, या जुन्या मुलाखतीत त्यांनी परवीन बाबी यांच्याबद्दलच्या काही आठवणींना उजाळा दिला होता. परवीनसोबतच्या नात्याविषयी सांगताना डॅनी म्हणाले होते, ‘त्यावेळी आम्ही तरुण होतो. समजुतदार होतो. जवळपास चार वर्षे आम्ही एकत्र राहिलो. मुख्य म्हणजे त्यावेळी संपूर्ण चित्रपटसृष्टीत आमच्या नात्याविषयी बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतरच्या काळात आमच्या नात्यात दुरावा आला खरा पण, तरीही आमची मैत्री मात्र कायम टिकून राहिली.’ माझ्यापासून दुरावल्यानंतर परवीन कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण, त्यावेळीसुद्धा ती मला घरी जेवणासाठी बोलवायची, असंही त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. त्यावेळी डॅनी यांच्या आयुष्यातही प्रेम परतलं होतं. ते अभिनेत्री किमला डेट करत होते. पण, परवीनच्या वागण्यामुळे त्यांच्या आणि किमच्या नात्यात बराच तणाव निर्माण झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor danny denzongpa talks about actress parveen babi the woman he once loved almost for four years ssj
First published on: 04-04-2020 at 13:54 IST