‘जाने तू या जाने ना’, ‘बागी २ ‘आणि ‘मुल्क’ या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता प्रतिक बब्बर पत्नी सान्या सागरपासून विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. प्रतिक आणि सान्याने २३ जानेवारील २०१९ रोजी लग्नगाठ बांधली होती. मात्र त्यांच्यात वरचेवर खटके उडत असल्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

‘स्पॉटबॉय’नुसार, सान्या आणि प्रतिक यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून मतभेद सुरु आहेत. त्यामुळे ते काही दिवसापासून विभक्त राहत आहेत. परंतु या विषयी प्रतिकला विचारले असता त्याने मौन बाळगणं पसंत केलं. इतकंच नाही तर राज बब्बर यांनी आयोजित केलेल्या होळी पार्टीतदेखील सान्या आली नव्हती.

 

View this post on Instagram

 

@_prat #mylilone #highfashionmen #highfashionwomen @gauravguptaofficial #hautecouture #sheerdress #stripesuit #sexyassbitch

A post shared by Sanya Sagar (@pynkmoss) on

दरम्यान, प्रतिक आणि सान्याने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं असून प्रतिकने सान्यासोबतचे सगळे फोटो डिलीट केले आहेत. प्रतिक आणि सान्या लग्नापूर्वी एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर २३ जानेवारील २०१९ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. लखनऊमध्ये मोठ्या थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. सान्य सागर बसपा नेते पवन सागर यांची मुलगी आहे. ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा प्रतिक हा मुलगा आहे.