scorecardresearch

करोनामुळे ५८ क्रू मेंबर्ससोबत परदेशात अडकला अभिनेता

चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे

करोनामुळे ५८ क्रू मेंबर्ससोबत परदेशात अडकला अभिनेता

मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जॉर्डनला गेला होता. पण करोनामुळे पृथ्वीराज चित्रपटाच्या ५८ क्रू मेंबर सहित जॉर्डनमध्ये अडकला आहे. शुक्रवारी नॉन रेसिडेंट केरलाइट्स अफेअर्स (NORKA) विभागाने जॉर्डनमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी NORKAच्या मुख्य सचिवांशी बोलून तेथे अडकलेल्या भारतीयांची माहिती घेण्यास सांगितली आहे.

सध्या करोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. अशा परिस्थितीमध्ये अभिनेता पृथ्वीराज आणि त्याच्या चित्रपटाचे क्रू मेंबर जॉर्डनमध्ये अडकले आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे.

रमेश यांनी ट्विटरवर ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘अभिनेता पृथ्वीराज चित्रपटाच्या ५८ क्रू मेंबरसोबत जॉर्डनमध्ये अडकला आहे. करोना व्हायरसमुळे त्यांना भारतात परत येणे शक्य होत नाही. याबाबत केरळच्या मुख्यमंत्र्यांना कळवण्यात आले आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या