‘झी स्टुडिओज’ची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार हे जाहीर झाल्यानंतर या चित्रपटाची उत्कंठा वाढवणारे आणखी एक पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. मराठी झ्र् हिंदी चित्रपट आणि वेबमालिकांमध्ये विविधांगी  भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची करारी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हर हर महादेव’ ही केवळ गर्जना नव्हती तर ती छत्रपतींच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळय़ांचा महामंत्र होता. समोरचा गनिम कितीही शक्तिशाली असो त्याला सळो की पळो करून सोडण्यासाठीची ऊर्जा निर्माण करणारी, मावळय़ांना नवी उमेद देणारी शिवगर्जना म्हणजे हर हर महादेव. हाच हर हर महादेवचा महामंत्र जपत बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्दी जौहरच्या सैन्याविरुद्ध घोडिखड लढवली आणि आपल्या प्राणांची आहुती देत घोडिखड पावन केली. बाजीप्रभूंच्या याच लढवय्या करारी बाण्याची गाथा अतिशय भव्य दिव्य स्वरूपात ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दिसणार आहे. 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sharad kelkar role of baji prabhu har har mahadev movie ysh
First published on: 02-10-2022 at 00:02 IST