बॉयफ्रेंडच्या वाढदिवसनिमित्त अंकिताची ही खास भेट; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

विकी जैनच्या वाढदिवसानिमित्त अंकिताने इन्स्टाग्रामवर मिडनाइट सेलीब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चागलाचं व्हायरल झाला आहे.

ankita
(Photo-Instagram/Ankita Lokhande)

‘पवित्र रिश्ता’फेम अंकिता लोखंडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. रविवारी अंकिताने तिच्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस साजरा केला. अंकिता लोखंडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. नुकताच अंकिताने तिच्या बॉयफ्रेंड विकी जैनचा वाढदिवस साजरा केला. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर  मिडनाइट सेलीब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे.

अंकिता या व्हिडीओमध्ये विकीला अॅपलचे एयरपॉड्स गिफ्ट करताना दिसली, या दरम्यान विकीची रिएक्शन पाहण्या सारखी आहे. ते एयरपॉड्स पाहताच विकीला खूप आनंद झाला. त्याने अंकिताला घट्ट मिठी मारील. त्यानंतर अंकिताने देखील विकीला किस्स केल्याचे या व्हिडीओत दिसून आले. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओला कॅप्शन देत तिने लिहिले की, “येणारवर्ष तुझ्यासाठी उत्तम आहे आणि ते माझ्या सोबत आहे. मी वचन देते की मी तुझ्या सुखात आणि दु:खात सदेव तुझ्या सोबत राहीन.” अंकिताने शेअर केलेल्या या पोस्टवर कलाक्षेत्रातील बरेच कलाकार विकीला शुभेच्छा देताना दिसले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

विकी जैनच्या वाढदिवसानिमित्तं दिवसभर अंकिता इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना दिसली. यापूर्वी अंकिता लोकप्रिय दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत सोबत रिलेशनमध्ये होती. कालांतराने ते दोघे वेगळे झाले. सुशांत सिंग राजपूतच्या अचानक निधनानंतर त्याचे फॅन्स अंकितावर आरोप लावत होते. त्यानंतर अंकिताने एका इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये हे स्पष्ट केले की,”मला उगाचं ब्लेम केलं जातं आहे. तुम्हाला के माहिती आहे आमच्या नात्याबद्दल. जर का माझी चूक होती तर जेव्हा आमचं नात तुटलं तेव्हा तुम्ही कुठे होतात.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actress anikta lokhande shares pictures of midnight celebration of boyfriend vicky jain birthday video went viral aad