अभिनेत्री अनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्ट सुभाष वांगल उर्फ सुब्बू यांचं निधन झालं आहे. सुब्बू यांच्या निधनामुळे अनुष्का प्रचंड भावूक झाली असून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलं आहे. सोबतच तिने त्यांच्यासोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सुभाष हे फार प्रेमळ आणि विनम्र होते. त्यांची आणि माझी चांगली मैत्री होती. त्यामुळे मी त्यांना कायम maestro( उस्ताद) म्हणायचे. त्यांच्या कौशल्यामुळेच मी पडद्यावर कायम सुंदर दिसायचे. ते आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कामामुळे आणि गुणवत्तेमुळे ते प्रत्येकाच्या स्मरणात राहतील. आज एक चांगला मुलगा, भाऊ आपल्यातून निघून गेला”, असं म्हणत अनुष्काने सुभाष यांना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, काही काळापूर्वी अनुष्का ‘जीरो’ या चित्रपटात झळकली होती. मात्र त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात झळकलेली नाही. तसंच तिने अद्यापही कोणत्या चित्रपटही घोषणा केलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress anushka sharmas make up artist subhash wangal die anushka express condolence on social media ssj
First published on: 07-12-2019 at 11:02 IST