नव्वदच्या दशकातील ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. चित्रपटात बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि अभिनेत्री भाग्यश्री मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातून भाग्यश्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सलमानसोबत स्क्रीनवर रोमँटिक अंदाजात दिसलेली भाग्यश्री आता दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाग्यश्री प्रभासचा आगामी चित्रपट ‘प्रभास 20’मध्ये भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती प्रभासच्या आईच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे. सध्या ‘प्रभास 20’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून भाग्यश्रीने देखील चित्रीकरणास सुरुवात केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. भाग्यश्रीची चित्रपटातील भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे.

हा चित्रपट प्रभासच्या करिअरमधील २०वा चित्रपट असल्यामुळे चित्रपटाचे नाव ‘प्रभास 20’ असे ठेवण्यात आले आहे. तसेच ही एक जुन्या काळातील लव्ह स्टोरी असून अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राधाकृष्ण कुमार करत आहेत. चित्रपटात प्रभास ज्योतिषाची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाग्यश्रीने १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मै ने प्यार किया’ सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने २-३ हिंदी चित्रपटात काम केले. पण या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. तिने तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याव्यतिरिक्त बंगाली, भोजपुरी या चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले.