वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी अटक होऊन नंतर सुटका झालेली ‘गंदी बात’या वेबसीरिजमधील अभिनेत्री गहना वशिष्ठची प्रकृती सध्या बरीच गंभीर आहे. गहनाला शनिवारी(३ जुलै) हृदयविकाराचा झटका आला होता. ज्यानंतर तिला एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताज्या माहितीनुसार गहनाच्या फुफुसांनी देखील काम करणं बंद केले आहे. ज्यांनतर तिला कार्डियोप्लमोनरी बायपासवर ठेवण्यात आले आहे. कार्डियोप्लमोनरी बायपास एक विशिष्ट तंत्र आहे, ज्यामध्ये एकप्रकारची मशीन लावली जाते, ज्याला ‘हार्ट लंग’ देखील म्हणातात. हे आवश्यक भागाची सर्व कामं करते.

अभिनेत्री गहना वशिष्ठचे प्रवक्ते फ्लेन रेमेडीज यांनी यूएनआय इंडियाशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. फ्लेन यांनी सांगितले की, डॉक्टर प्रणव काब्रा(डायबिटॉलजिस्ट आणि कार्डियक इंटेंसिविस्ट) यांच्या मते गहनाची प्रकृती अतिशय गंभीर आहे. यासाठी तिला यंत्रोपचारावर ठेवण्यात आले आहे. सोमवारी सकाळी तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसली होती. मात्र दुपारी पुन्हा तब्येत बिघडली. तर, मी आतापर्यंत रूग्णालायत तिची भेट घेऊ शकलेलो नाही. त्यांच्या इमारतीमधून मला समजले की तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मला सांगण्यात आले की ती सध्या बेशुद्ध आहे व कुणाशीही बोलण्याची स्थितीत नाही. मी तिची भेट घेण्यासाठी रूग्णालयात जाईन, त्यानंतर अधिक माहिती देईन.

वेब सीरिजच्या नावाखाली ‘पॉर्न व्हिडीओ’चं शुटिंग; अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक

या अगोदर गहना वशिष्ठ जेव्हा महिला तुरूंगात होती, तेव्हा देखील तिला हृदयविकाराचा झटका बसला होता आणि तिला तत्काळ जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे तिसऱ्यांदा आहे, जेव्हा गहना वर्षभराच्या आत तिसऱ्यांदा रूग्णालयात दाखल झालेली आहे. गहनाला ७ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील व्हिडिओ प्रकरणी अटक केली होती. ज्यानंतर ती पाच महिने तुरूंगात होती, नंतर तिला जामीन मिळाला.

गहना वशिष्ठ मॉडेल व अभिनेत्री असून, तिने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेबसीरिजमध्येही तिने काम केलं असून, मिस आशिय बिकिनी स्पर्धाही तिने जिंकलेली आहे. त्याचबरोबर दाक्षिणात्य सिनेमातही गहनाने भूमिका केलेल्या आहेत.