‘खुलता खळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडमधील राहत्या घरात आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आशुतोषने गळफास लावून स्वत:चे आयुष्य संपवले. या घटनेमुळे आशुतोषच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आशुतोषने हे टोकाचे पाऊल का उचलले यासंदर्भात कोणताही माहिती समोर आलेली नाही. आशुतोष हा ३२ वर्षांचा होता.

आशुतोषच्या हत्येचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच आत्महत्येसंदर्भातील एक व्हिडिओही आपल्या फेसबुक प्रोफाइलवरुन पोस्ट केला होता. यामध्ये त्याने माणूस आत्महत्या का करतो यासंदर्भात आपल्या चाहत्यांशी संवाद साधला होता. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये आशुतोषनेच असे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पोलीस सध्या या व्हिडिओचा आशुतोषच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का या दृष्टीनेही तपास करत आहेत. ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास आशुतोषने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
vasai suicide marathi news
वसई: चित्रफित तयार करून तरुणाची आत्महत्या, पोलिसाने धमकी दिल्याचा चित्रफितीत आरोप
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

लॉकडाउनमुळे आशुतोष आणि मयुरी हे दोघे त्यांच्या नांदेडमधील घरीच राहत होते. आशुतोषची आई आणि मयुरी गप्पा मारत असतानाच आशुतोष वरच्या खोलीमध्ये होता. बराच वेळ तो खाली न आल्याने घरातील सदस्य त्याला पाहण्यासाठी गेले असता त्याने गळफास लावून घेतल्याचे दिसून आलं. आशुतोष आणि मयुरीमध्ये कोणतेही मतभेद नव्हते असं त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी म्हटलं आहे. असे असतानाही आशुतोषने आत्महत्या का केली यामागील गूढ अद्याप कायम आहे.

मयुरीने २० जानेवारी २०१६ रोजी आशुतोष देशमुखबरोबर लग्न केलं. आशुतोषने ‘इच्यार ठरला पक्का’ आणि ‘भाकर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘खुलता कळी खुलेना’मधून मयुरी घराघरात पोहचली. त्यानंतर तिने काही व्यावसायिक नाटकांमध्येही काम केलं. मयुरीने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले ‘डिअर आजो’ रंगभूमीवर चांगलेच गाजले. लॉकडाउनचे निर्बंध लागण्याआधी मयुरी ‘बादशाह हम’ या नाटकात काम करत होती.

मयुरीने ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २०१७ साली मयुरीने व्हॅलेटाइन्स डे निमित्त खास ‘लोकसत्ता’ सोबत आशुतोष सोबतची तिची लव्हस्टोरी शेअर केली होती. यामध्ये तिने आशुतोष पहिल्याच भेटीत तिच्या प्रेमात पडल्याचे सांगितले होते. तो संपूर्ण लेख तुम्ही येथे क्लिक करुन वाचू शकता.