स्मिता तांबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाळेबंदी आधी हिंदी-मराठी चित्रपट आणि वेबमालिका यांच्या चित्रीकरणात व्यग्र असलेली अभिनेत्री स्मिता तांबे आताही काही प्रमाणात का होईना नव्या माध्यमांच्या मदतीने आपल्या कामाशी जोडली गेली  आहे. टाळेबंदीच्या या काळातच मला आणखी काही वेबमालिकांचे प्रस्ताव आले होते. या वेबमालिकांसंदर्भातील करारपत्रांची पूर्तता करण्याच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच करारावर डिजिटल स्वाक्षरी के ली आहे, असे स्मिता सांगते. टाळेबंदीत बाकी सगळेच व्यवहार ठप्प असताना ऑनलाइन माध्यमातून सुरू असलेली पुढच्या भूमिकांची तयारी आणि यानिमित्ताने पहिल्यांदाच के लेली डिजिटल स्वाक्षरी या दोन्हींचे आपल्याला अप्रूप वाटते, असे ती म्हणते.

सध्या नवीन वेबमालिके साठी आम्ही पूर्वतयारी सुरू के ली आहे. झूम अ‍ॅपच्या मदतीने आम्ही आमच्या बैठका घेतो, आमच्या भूमिका आणि इतर तयारीसंदर्भात चर्चा करतो आहोत. घरातच राहून आपापल्या भूमिकांची तयारी करणे हा सध्याच्या दैनंदिनीतला महत्त्वाचा भाग आहे, असे तिने सांगितले. टाळेबंदीच्या या काळात तंत्रज्ञानाने सगळ्यांना जोडून घेतले आहे, अशी भावना तिने व्यक्त के ली. सध्या रोजच्या रोज ऑनलाइन माध्यमातून आपापल्या मित्र परिवाराशी, निकटवर्तीयांशी संवाद सुरू आहे. हे खरे तर आपण आधीही करू शकलो असतो, पण तेव्हा वेळ नव्हता आणि आता आहे त्या वेळेत सगळ्यांशी गप्पा मारणे, इन्स्टाग्रामसारख्या अ‍ॅपच्या मदतीने लाइव्ह चाहत्यांशी संवाद साधणे सहजपणे शक्य झाले असल्याचे तिने सांगितले. कामाचा हा भाग सोडला तर एरव्हीही सर्जनशील गोष्टी करण्यात रमणारी स्मिता आताही वेगवेगळ्या गोष्टी करून पाहते आहे.

टाळेबंदी असल्याने सध्या घरातली सगळीच कामे आपली आपल्याला करावी लागतात. त्यामुळे रोज सकाळी उठून पहिले घराची साफसफाई आदी कामे पूर्ण करावी लागतात, असे ती सांगते. त्यानंतर उरलेल्या वेळेत वेगवेगळे पदार्थ बनवणे, स्वयंपाकातले नानाविध प्रयोग सुरू आहेत. याशिवाय, मी सध्या एक गोधडी शिवते आहे. या गोधडीवर वेगवेगळ्या प्रकारे भरतकाम, नक्षीकामही करत असल्याचे तिने सांगितले. मला पुस्तक वाचायला खूप आवडते त्यामुळे सध्या स्त्रीप्रधान साहित्य वाचवण्यावर भर देते आहे. वेगवेगळ्या वेबमालिकाही सध्या पाहते आहे. एके क-दीड तासांच्या अंतराने मी या वेबमालिका पाहते. मला स्वत:ला ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका सर्वाधिक आवडते. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ आणि ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ या दोन्ही वेबमालिका मी कधीही आवडीने पाहू शकते इतक्या मला त्या आवम्डतात, असेही स्मिताने सांगितले.

संकलन – रेश्मा राईकवार

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress smita tambe activities in lockdown zws
First published on: 08-05-2020 at 02:20 IST