अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा सीबीआयची विशेष टीम तपास करत आहे. आतापर्यंत सीबीआयने या प्रकरणी अनेकांची चौकशी केली आहे. या चौकशीत अनेक गोष्टींचा खुलासादेखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, सीबीआयने अद्याप महेश भट्ट यांची चौकशी का केली नाही, असा प्रश्न अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती हिने उपस्थित केला आहे.
सुचित्रा कृष्णमुर्तीने ट्विट करत महेश भट्ट यांची चौकशी का करण्यात येत नाही, असा प्रश्न विचारला आहे. “सीबआयने महेश भट्टला चौकशीसाठी बोलावलं आहे? जेव्हा रियाने सुशांतचं ८ जून रोजी घर सोडलं, तेव्हा ते इतके एडमन्ट का करत होते?”, असं ट्विट सुचित्राने केलं आहे.
Has #MaheshBhatt been called in by #CBI for questioning? Why was he so adamant #Rhea leave #SSR when she did on 8th June?
— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) August 31, 2020
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अनेकांनी चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. तसंच त्यांच्यावर घराणेशाहीचे आरोपदेखील करण्यात आले आहेत. त्यातच मध्यंतरी रिया आणि महेश भट्ट यांच्याचील मेसेज चॅटदेखील समोर आले होते. त्यामुळे सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी अनेकांनी महेश भट्ट यांच्यावर आरोपप्रत्यारोप केले आहेत.