५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मोदी सरकारने अचानकपणे बंद केल्यामुळे व्यावसायिकांना मात्र याचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. याचा फटका मराठी नाट्य सृष्टीलाही पडला आहे. प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शनचे ‘गेला उडत’ आणि सुनिल बर्वे यांच्या सुबकची निर्मिती असलेले ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकांचे प्रयोग काही काळासाठी रद्द केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र आता या सर्व गोष्टीवर पर्याय म्हणून ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाच्या टीमने धनादेश, ऑनलाइन बुकिंग, डेबिट कार्ड, बुक माय शो अशा अनेक मार्गांनी तिकीट विक्री करण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या या नव्या प्रयत्नाला भरघोस प्रतिसादही मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नुकतेच अमेय वाघने सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये अभिनेता सुनिल बर्वे, सखी गोखले आणि अमेय वाघ या कलाकारांनी हातात खूप सारे धनादेश घेतल्याचा पाहायला मिळत आहे. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी अनेक लाइक्स दिले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या या पयार्याचे अनेकांनी मनापासून कौतुकदेखील केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After demonetisation marathi theater play amar photo studio started accepting cheques
First published on: 05-12-2016 at 20:33 IST