पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्थानकावर रानू मंडल यांनी गायलेल्या ‘एक प्यार का नगमा है’ या गाण्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना संगीतकार हिमेश रेशमिया यांनी चित्रपटात गाण्याची संधी दिली होती. त्यानंतर आता त्यांच्याचप्रमाणे एका उत्तर प्रदेशातील लखनौमधील एका उबर चालकाचा गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विनोद असं या चालकाचं नाव आहे. त्यांच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीनं त्यांच्याकडे गाणं गाण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी गायलेलं गाणं प्रवाशाने आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलं.
विनोद हे या व्हिडीओमध्ये 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि गायक कुमार सानू यांनी स्वरबद्ध केलेल्या आशिकी या चित्रपटातील ‘नजर के सामने’ हे गाणं गाताना दिसत आहेत. प्रवाशानं त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर टाकला. काही सेकंदाच्या आतच हा 56 सेकंदाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तसंच विनोद हे उत्कृष्ट गायक असून त्यांना एकदा तरी भेटा असं ट्विटही प्रवाशानं केलं.
Mr. Vinod is one famous driver-partner who keeps on receiving positive mentions on our pages for his musical rides. We’re glad to hear this #UberStar‘s passionate voice being recognized and shared by the good Samaritans of the internet.
— Uber India (@Uber_India) September 15, 2019
यावर उबर इडियाकडूनही एक प्रतिक्रिया देण्यात आली. विनोद यांच्या गायाकीची अनेकांकडून स्तुती होत असते. तसंच विनोद यांच्या गायन कौशल्याचीही त्यांनी स्तुती केली. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यू आणि लाइक्स मिळाले आहे. यापूर्वी रानू मंडल यांचाही व्हिडीओ अशाप्रकारे व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना गाण्याची संधीही मिळाली होती.