महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा यांनी दिग्दर्शक साजिद खानवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर बॉलिवूड पुन्हा एकदा हादरलं आहे. साजिदवरच्या आरोपानंतर अक्षयनं तातडीनं ‘हाऊसफुल ४’चं चित्रिकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे साजिदनं सारी नैतिक जबाबदारी स्वीकारत हाऊसफुलच्या दिग्दर्शक पदावरून पायउतार होत असल्याचं ट्विट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

#MeToo: ‘साजिद खान नको तिथे स्पर्श करायला लावायचा’

‘माझ्यावर जे काही आरोप होत आहेत त्यामुळे माझ्या कुटुंबावरदेखील दबाव वाढत आहे. मी आता नैतिक जबाबदारी स्वीकारत हाऊसफुल 4 च्या दिग्दर्शक पदावरून पायउतार होत आहे. माझ्यावर जे काही आरोप होत आहेत ते खोटे असल्याचं मी सिद्ध करेनच. सत्य लोकांना लवकरच कळेल. पण तोपर्यंत माझ्याविषयी कोणतंही मत तयार करून गैरसमज करू नका’ असं साजिदनं ट्विट करत म्हटलं आहे.

साजिदवर होत असलेल्या आरोपांमुळे अभिनेता अक्षय कुमारनं ‘हाऊसफुल ४’ चं चित्रीकरण पूर्णपणे थांबवण्याची विनंती निर्मात्यांना केली आहे. तसेच लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत काम करणार नसल्याचंही अक्षयनं म्हटलं आहे. लैंगिक गैरवर्तणुकीसारखे प्रकार खूपच गंभीर आहेत या प्रकरणात कडक कारवाई होणं गरजेचं आहे असंही अक्षयनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

‘हाऊसफुल ४’ मध्ये काम करत असलेले अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर देखील लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप आहेत. त्यामुळे या दोन्ही कारणानं अक्षयनं या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After sexual harassment allegation sajid khan step down from houseful
First published on: 12-10-2018 at 13:23 IST