अमिताभ बच्चन यांनी ७२व्या वर्षी नायक म्हणून स्वत:च्या बळावर भूतनाथ रिटर्न्स हा चित्रपट यशस्वी केला आणि अजूनही आपले नाणे खणखणीत असल्याचे चित्रपटसृष्टीला दाखवून दिले. अमिताभ सध्या गोवा येथे आर. बाल्कीच्या चित्रपटासाठी धनुषबरोबर चित्रीकरण करत आहेत. यावेळी आपल्या ब्लॉगवर भावना व्यक्त करताना बिग बी म्हणतात, “माझ्या वयाची बहात्तरी उलटून गेली तरी ते(दिग्दर्शक) मला अजून धावायला सांगतात. चित्रपटातील एखादा संवाद बोलताना श्वासात योग्य तो चढ-उतार येण्यासाठी दिग्दर्शक अजूनही मला धावायला किंवा पायऱ्यांवरून चढायला आणि उतरायला सांगतात. हाहाहा… परंतु, असे करताना ते माझे वय विसरून जातात. निसर्गाने आपले काम चोख बजावलेले आहे, त्यामुळे माझ्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आली ही गोष्ट दिग्दर्शक साफ विसरून जातात. परंतु, माझ्या मनात पूर्वीची उमेद कायम असल्यामुळे शरीर हे सगळे निभावून नेते. माझ्या मनाला अजूनही मी पंचवीस वर्षांपूर्वी होतो तसेच धावावेसे वाटते. कालची संपूर्ण रात्र मी झोप घेऊ शकलो नाही त्यामुळे मला आता विश्रांतीची आणि झोपेची गरज आहे.” आर. बाल्की दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटातून तामिळ सुपरस्टार कमल हसनची मुलगी अक्षरा चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2014 रोजी प्रकाशित
वयपरत्वे माझ्या शरीराला थकवा आला आहे, मनाला नाही – अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांनी ७२व्या वर्षी नायक म्हणून स्वत:च्या बळावर भूतनाथ रिटर्न्स हा चित्रपट यशस्वी केला आणि अजूनही आपले नाणे खणखणीत असल्याचे चित्रपटसृष्टीला दाखवून दिले.
First published on: 23-04-2014 at 05:39 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Age has slowed down my body not my mind amitabh bachchan