गेल्या वर्षभरापासून झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतेय. या मालिकेच्या कथानकातील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना त्यात गुंतवून ठेवतायत. आपला मुलगा बबड्या अर्थात सोहमला कायम पाठिशी घालणारी त्याची आई आसावरी आता त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. आसावरीच्या भोळ्या व भाबड्या स्वभावाचा बबड्याने नेहमीच फायदा घेतला आहे. मात्र आता मालिकेच्या आगामी भागांत, आसावरी त्याला घरातून हाकलून काढणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिजीत यांचा खरा चेहरा समोर आणणारे काही पुरावे माझ्याकडे आहेत, असं सोहम आसावरीला सांगणार आहे. अभिजीत हे आसावरीच्या योग्य नाहीत हे ऐकताच ती सोहमच्या कानाखाली वाजवते. अभिजीत यांच्याविरोधात एकही शब्द न ऐकणारी आसावरी सोहमला घराबाहेर काढते आणि जोपर्यंत त्याच्या वागणुकीत बदल होत नाही, तोपर्यंत घरात घेणार नसल्याचं ती स्पष्ट करते.

मालिकेत नुकत्याच पार पडलेल्या भागात शुभ्रा आसावरीला सर्वकाही खरं सांगते. सोहममुळे अभिजीत घर सोडून जातात, असं ती आसावरीला सांगते. या मालिकेत निवेदिता सराफ, गिरीश ओक, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aggabai sasubai preview asawari to throw soham out of the house ssv
First published on: 28-10-2020 at 10:32 IST