माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनने दोन वर्षांपूर्वी एका गोंडस, सुंदर मुलीला जन्म दिला. बॉलीवूडमधल्या नामांकित कुटुंबात जन्माल्या आलेल्या आराध्याला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत.
आपल्या विश्वसुंदरी आईसोबत आराध्या सध्या सर्वत्र दिसत असते. आई ऐश्वर्या आणि आजोबा अमिताभ बच्चन यांच्याहीपेक्षा आराध्याच्या चाहत्यांची यादी मोठी आहे. ही चिमुकली आईप्रमाणेच स्टाईलिश असल्याचे वेळोवेळी दिसते. तिच्या सुंदर अशा ड्रेसवर त्याच रंगाचे शूज आणि डोक्यावर हेअर बॅण्ड अशा सुंदर रुपात स्टाईलिश आराध्या आई ऐश्वर्यासोबत दिसत असते. आराध्याची सुंदर असे गुलाबी शूज, गम बूट घालण्याच्या पद्धतीमुळे तिला फॅशनेबल सेलिब्रिटी मुलांपैकी एक असल्याचे समजले आहे. इतकेच नाही तर आराध्याच्या छायाचित्रांना फेसबुकवर मिळालेली पसंती ही तिच्या आजोबांच्या सर्वाधिक लाईक मिळालेल्या छायाचित्रापेक्षा तीनपटीने जास्त असल्यामुळे, आजोबा अमिताभ बच्चनदेखील छोट्याशा आराध्येची लोकप्रियता पाहून चकित होतात.
आराध्याला पहिल्या वाढदिवसाला अमिताभ बच्चन यांनी ‘मिनी कूपर एस कार’ भेट म्हणून दिली होती. आता यंदाच्या वाढदिवसाला या चिमुकलीच्या भेटवस्तूंच्या यादीमध्ये काय काय आहे हे पाहणे औसुख्याचे असणार आहे.